
अभिजीत कुलकर्णी
नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरणामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सहा महिन्यांत सतरा अपघात झाले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू तर अकराजण गंभीर जखमी झाले आहेत. मालवाहतूक अवजड वाहने महामार्गावरून सेवा मार्गावर उलटण्याच्या घटनाही पाच घडल्या आहेत. शिवाय जिल्ह्यांतर्गत औद्योगिक वसाहतींमध्ये पोहोचण्यासाठी वीस मिनिटांच्या अंतरासाठी तास लागत आहे. यामुळे वाहतूकदार, प्रवासी त्रस्त झाले आहेत.