शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक ही त्यांनी घडवून आणलेली मनो-राजकीय क्रांती आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal
Summary

चोहो दिशांना सर्वत्र मुस्लिम शाह्यांचे राज्य असताना छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव मराठे राजे झाले, ही काही सामान्य बाब नव्हती.

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक ही त्यांनी घडवून आणलेली मनो-राजकीय क्रांती आहे. शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (Dr. Jaysingrao Pawar) यांनी येथे केले.

शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) व स्वराज्य स्थापना दिन यांच्या ३५० व्या वर्धापन वर्षानिमित्त ‘मराठा इतिहास संशोधनाचा कक्षाविस्तार’ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन विद्यापीठात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर डॉ. पवार यांचे बीजभाषण झाले.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी प्रमुख उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाले, ‘चोहो दिशांना सर्वत्र मुस्लिम शाह्यांचे राज्य असताना छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव मराठे राजे झाले, ही काही सामान्य बाब नव्हती.

Chhatrapati Shivaji Maharaj
देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात राज्याभिषेकाची कोणतीही पूर्वपिठिका नसताना महाराजांना ही संकल्पना सुचणे हीही एक क्रांतिकारक घटना होती. राज्याभिषेकाची संकल्पना गागाभट्टाची मानणे गैर आहे. गागाभट्टाने महाराष्ट्रातील राज्याभिषेकाच्या विरोधकांना शांत करण्याचे महत्त्वाचे काम केले आणि दुसरे म्हणजे ‘श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः’ ही पुस्तिका निर्माण केली. हे त्याचे योगदान मात्र नाकारता येणार नाही.’

Shivaji University National Council
Shivaji University National Councilesakal

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन करण्यासाठी फेलोशिप देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मराठ्यांच्या महाराष्ट्राबाहेरील इतिहासाबाबतही संशोधन करण्याची गरज आहे.’ डॉ. नीलांबरी जगताप यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, या परिषदेच्या निमित्ताने विद्यापीठ संग्रहालय संकुलामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विशेष प्रदर्शन भरविले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
कोकणात 'अणुऊर्जा, रिफायनरी'ला विरोध असताना माशेलकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, सरकारनं माझ्यावर जबाबदारी टाकली तर..

मराठ्यांची भरारी

मराठ्यांत पिढ्यान्‌पिढ्या रुजलेली गुलामीची मानसिकता दूर करून भूमिपुत्र म्हणून जबाबदारीची भूमिका बजावण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे, अशी महाराजांची भावना आणि अपेक्षा होती. मराठ्यांनी ही भावना सार्थ ठरविली. त्यांनी फिनिक्सप्रमाणे भरारी मारत आपले लढवय्येपण सिद्ध केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com