कोल्हापूरकरांनो! रंगपंचमीची तयारी करीत आहात: वाचा जिल्हाधिका-यांचा आदेश

holi not celebrated in kolhapur for this year due to corona
holi not celebrated in kolhapur for this year due to corona

कोल्हापूर : जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. होळी, रंगपंचमी किंवा धूलिवंदन साजरा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. जिल्ह्यात होळी किंवा रंगपंचमी साजरी केली जाते. तरुण-तरुणी गटागटाने रंगपंचमी खेळतात. अपार्टमेंटमध्येही मुलांपासून जेष्ठांपर्यंत रंगपंचमी खेळतात; पण कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रशासनाने होळी, धुलिवदंन आणि रंगपंचमी खेळण्यावर बंदी आणली आहे.

देसाई म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत; पण रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यात रविवारी (२८) होळी, सोमवारी (२९) धुलिवंदन आणि शुक्रवार (२ एप्रिल) होणारी रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. गावागावातही ज्या-त्या तालुक्‍याच्या ठिकाणच्या पोलिसांनी लक्ष ठेवायचे आहे. गर्दी टाळण्यासाठी यंत्रणा आवश्‍यक ते नियोजन करत आहे. दरम्यान, लोकांनीही स्वत:हून गर्दी टाळून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही आवाहन देसाई यांनी केले.

तर कारवाई नक्की

गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यास मनाई आहे. आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com