कोल्हापूर: उंच झाडांचा महावितरणच्या विद्युतवाहिन्यांना स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटने रमणमळ्यातील हॉटेलच्या शेडला आग लागली. यामध्ये हॉटेलचे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. छताकडून आग खाली पसरत गेली..स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. रमणमळा परिसरातील वागळे इस्टेट परिसरात धैर्यशील जाधव यांचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या आवारात झोपडीची सजावट करून एक शेड उभारण्यात आले आहे. .Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला.शेडच्या बाजूला पामची झाडे लावण्यात आली आहेत. यावरून गेलेल्या महावितरणच्या विद्युतवाहिन्यांना झाडांचा स्पर्श होऊन ठिणग्या पडत होत्या. आज दुपारी या ठिणग्या शेडवर पडून गवताने पेट घेतला. छतावरील प्लािस्टक आवरण व बांबूने पेट घेतला. छताकडून आग हॉटेलमध्ये पसरत गेली. .बाहेरील बाजूस ठेवलेल्या खुर्च्या, टेबलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, घटनेची माहिती समजताच कसबा बावडा फायर स्टेशनचा बंब दाखल झाला. मात्र, चिंचोळ्या जागेतून बंब हॉटेलपर्यंत आणण्यात अडथळे आले. .Train Accidnet: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन तो रेल्वे....यामुळे पुन्हा छोट्या वाहनाला पाचारण करण्यात आले. यामध्ये अर्धा तासाहून अधिक वेळ गेला. अग्निशमन दलाचे जवान सुशांत पवार, निवास जाधव, पुंडलिक पवार, उमेश जगताप, माणिक कुंभार, शुभम कुंभार यांनी आग आटोक्यात आणली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.