esakal | दुर्देव : झोपेत असतानाच जळाला तिचा संसार 
sakal

बोलून बातमी शोधा

house burned in the fire in kolhapur

आक्काताई शशिकांत सुतार या आपल्या मुलासह कौलारू घरात राहतात.

दुर्देव : झोपेत असतानाच जळाला तिचा संसार 

sakal_logo
By
पंडीत कोईगडे

बामणी ( ता कागल) - येथे मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतमजूर विधवा महिलेचे घर आणि प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे महिलेसह तिच्या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेमध्ये घराच्या छतासह, धान्य, भांडी,कागदपत्रे  आदी  साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे ही शेतमजूर महिला उघड्यावर आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी, येथील आक्काताई शशिकांत सुतार या आपल्या मुलासह कौलारू घरात राहतात. नेहमीप्रमाणे जेवण करून झोपल्या असताना रात्री दिडच्या सुमारास घरामध्ये त्यांना मोठा आवाज आला. त्यामुळे त्यांनी धावाधाव केली तर घरात आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा केला. त्यामुळे आसपासचे नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. जळत असलेल्या खोलीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी होती. दोन तरुणांनी या जळत्या खोलीमध्ये धाव घेऊन ही टाकी बाहेर काढली. अन्यथा या टाकीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शिवाय घरामध्ये असलेली मोटरसायकलसुद्धा सुखरूपपणे बाहेर काढली.
 ग्रामसेवक संग्राम खाडे, तलाठी टी. पी नाईक, पोलिस पाटील महादेव कुंभार, सागर बाबर आदींनी या जळीत घराचा पंचनामा केला. 

हे पण वाचाकोल्हापूरच्या उपनगरांतील गुन्हेगारीला आता बसणार आळा

 दरम्यान हातावर पोट असलेल्या शेतमजूर महिले पुढे आता निवाऱ्यासह दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
   
संपादन- धनाजी सुर्वे 

loading image
go to top