अमेरिकेत आज रंगणार शिवराज्याभिषेकदिन सोहळा

 This is how the coronation day ceremony will be held in America today
This is how the coronation day ceremony will be held in America today
Updated on: 

कोल्हापूर  : "छत्रपती शिवाजी महाराज की जय,' चा जयघोष देशातच नाहीतर अमेरिकेत घुमणार आहे. यातच आज 6 जून शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी उत्तर अमेरिकेत केली आहे. कोरोनाच्या संकटात देखील या शिवरायांच्या मावळ्यांनी ऑनलाईन शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरी करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज सहभागी होऊन विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 
यंदाच्या राज्याभिषेकदिन उत्सवाला मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादा आल्या आहेत. मात्र संकटात थांबतील ते शिवभक्त कसले. या अमेरिकेतील शिवभक्तांनी हा दिवस थेट ऑनलाईन साजरा करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी न्यूयॉर्क स्थित अल्बानी ढोल ताशा पथकाने ऑनलाईन संवादाची दारे खुली केली आहेत. या संवादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वंशज असणारे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा ऑनलाईन संवाद होणार आहे. "अल्बानी' ढोल ताशा पथकाने "एक सांस्कृतिक परिवार, एक संकल्प मराठी जपण्याचा' या हेतूने पथकाची निर्मिती करून सातासमुद्रापार संस्कृती जपण्याचा ध्यास घेतला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

GBS suspected patients in Kalamba village
Shaktipeeth Highway Protest in Kolhapur
Giant Crocodile Spotted Daily on Khochi-Dudgaon Main Road
Farmer ID suspension for five years Maharashtra