

Historical Importance of Gopalgad Fort
sakal
रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेला ‘गोपाळगड किल्ला’ आता पूर्णपणे शासकीय अखत्यारित आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा किल्ला खासगी जागेत असल्याने आणि त्यावरून पर्यटकांना खासगी जमीनमालकांकडून येणाऱ्या वाईट अनुभवांमुळे हा विषय चांगलाच तापला होता.