
डी. आर. पाटील
शिरोळ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असतील, तर दोघांपैकी एकाचे नाव लाभार्थी यादीमधून रद्द करण्यासाठी शासनाने शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी या योजनेचा विसावा हप्ता लाभार्थ्यांना मिळण्यास विलंब होणार आहे.