Hupari Wife Attack Case : भरदिवसा मुख्य रस्त्यावर पाठलाग करून पत्नीवर पतीचा खुनी हल्ला; हुपरी-पट्टणकोडोली मार्गावर धक्कादायक घटना

Hupari Family Dispute Turns Violent : हुपरीतील तळंदगे फाट्याजवळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. पत्नी गंभीर जखमी असून सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
Hupari wife attack case

Hupari wife attack case

esakal

Updated on

हुपरी (कोल्हापूर) : कौटुंबिक वादाचे पर्यवसान मोठ्या भांडणात होऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. सुजाता श्रीशैल गुरव (रा. गणेश माळ, हुपरी) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. हुपरी-पट्टणकोडोली मार्गावरील तळंदगे फाट्यावर काल दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com