
Kolhapur Husband Wife End Of Life Case : पत्नीच्या विरहासह नैराश्येतून सागर प्रकाश पोवार (वय ३९, रा. सुभाषनगर, मूळ रा. भेंडे गल्ली, शिवाजी चौक) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे.