कोल्हापूर : प्रेमविवाह करून पत्नीचा छळ करत दहा लाखांचा हुंडा मागितल्याप्रकरणी रोहित अर्जुन दुधाणे (रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पत्नी गर्भवती असताना तिच्या पोटावर लाथ मारण्याची धमकी तो देत असल्याचे फिर्यादी विवाहितेने पोलिसांना सांगितले.