
कुंडलिक पाटील
कुडित्रे : जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू आहे. जुन्या पारंपरिक हजारो भाताच्या जाती दुर्मिळ बनल्या आहेत. लाल भात, दोडका, कोथिंबीर साळी, दगडी जात, साठी जात या सारख्या अनेक जाती नामशेष होत आहेत. पूर्वी सोन्याचा धूर म्हणजेच देशी वाण आणि अन्न धान्याची समृद्धता होती. एका अभ्यासानुसार हजारो भाताच्या जाती होत्या. सध्या हायब्रीडच्या वापरामुळे जुन्या जाती लोप पावत आहेत.