कोल्हापुरात पहिल्यांदाच 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त, २१ वर्षीय तरुणासह दोघांना अटक, वडील सरकारी नोकरीत

Hydroponic Ganja : वडील शासकीय नोकरीत असल्याने त्यांनी मुलाला शिक्षणासाठी कोल्हापुरात पाठवले. मात्र, वाईट संगतीतून तो ड्रग्ज तस्करीकडे वळल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
कोल्हापुरात पहिल्यांदाच 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त, २१ वर्षीय तरुणासह दोघांना अटक, वडील सरकारी नोकरीत
Updated on

Hydroponic Ganja Case Busted in Kolhapur महाविद्यालयीन मित्रांना गांजा, एम.डी. ड्रग्ज पुरविणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. शाहिद ईब्राहीम मोकाशी (वय २१, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार अब्राहम जॉकी घोन्सालीस (२३, रा. मुक्तसैनिक वसाहत) यालाही पकडण्यात आले. दोघांकडून ३१ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ६८ ग्रॅम एम. डी. ड्रग्ज, महागडे मोबाईल, दुचाकी असा सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोकाशी सायबर चौक परिसरात गांजा विकण्यास आला असता, पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com