Kolhapur Municipal Scam
Kolhapur Municipal Scamesakal

Kolhapur Municipal Scam : सब घोडे बारा टक्के! सर्वांना टक्केवारी देऊन बिलाची रक्कम घेतली; माझा बळी देऊ नका, ठेकेदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Kolhapur : कसबा बावड्यातील ड्रेनेज पाईपलाईनचे झालेले काम व ॲडव्हान्स म्हणून बिल घेतले आहे. ते मिळवण्यासाठी महापालिकेतील कनिष्ठांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतची ठरलेली टक्केवारी दिली आहे.
Published on

Kolhapur Commissioner Action : कसबा बावड्यातील ड्रेनेज पाईपलाईनचे झालेले काम व ॲडव्हान्स म्हणून बिल घेतले आहे. ते मिळवण्यासाठी महापालिकेतील कनिष्ठांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतची ठरलेली टक्केवारी दिली आहे. मी घोटाळा केलेला नसून दुसऱ्या ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी माझा बळी दिला जात आहे. मी चौकशीला तयार असून, सर्व अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी, असे पत्रक या प्रकरणातील ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी आज रात्री प्रसिद्धीस दिले. हे पत्रक मुख्यमंत्री, प्रशासक, जिल्हा पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबरोबरच इतर शासकीय विभागांना ई-मेलद्वारे पाठवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com