Nipani Politics : अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी विधानसभा निवडणूक लढवणार; काका पाटलांची मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former Congress MLA Kakasaheb Patil

'उत्तम पाटील काँग्रेसचे सभासद नसून आपण पक्षासाठी 40 वर्षे काम करतो.'

Nipani Politics : अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी विधानसभा निवडणूक लढवणार; काका पाटलांची मोठी घोषणा

निपाणी (बेळगांव) : काँग्रेसचे (Congress) नेते, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण विधानसभा निवडणूक (Nipani Assembly Election) लढवणार आहोत. काही दिवसांपूर्वी उत्तम पाटील (Uttam Patil) यांनी केलेल्या भाष्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. अफवांवर विश्वास न ठेवता कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil) यांनी केले. निपाणीत मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘रावसाहेब पाटील कुटुंबीयांबरोबर १९७८ पासून घरोब्याचे संबंध आहेत. उत्तम पाटील काँग्रेसचे सभासद नसून आपण पक्षासाठी ४० वर्षे काम करतो. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळींसह (Satish Jarkiholi) नेते बरोबरच आहेत. बोरगावमधील अण्णासाहेब हवले यांनी शिक्षण संस्था, बँका, सोसायटीद्वारे रचनात्मक कार्य केल्याने मताधिक्य मिळेल. माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांचाही पुढाकार आहे.

हेही वाचा: Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका; पक्षाचे कार्याध्यक्षच भाजपात दाखल

'कार्यकर्त्यांनी बेरजेचं राजकारण करावं'

माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, आपला लढा भाजपबरोबर असून कार्यकर्त्यांनी अफवांना बळी न पडता बेरजेचे राजकारण करावे, असे सांगितले. लक्ष्मण चिंगळे यांनी, मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी अण्णासाहेब हवले, राजू खिचडेंसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस पंकज पाटील, राजेश कदम, रोहन साळवे, बसवराज पाटील, शंकरदादा पाटील, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, विश्वास पाटील, किरण कोकरे, बाबा पाटील, निकु पाटील, नवनाथ चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी आभार मानले.

हेही वाचा: Political News : 'विरोधी गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील'

टॅग्स :KarnatakabelgaumNipani