Political News : विरोधी गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील; मंत्र्याची थेट धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Political News

अशोक गेहलोत गटाच्या आमदारानं थेट काँग्रेस हायकमांडलाच चॅलेंज केलं आहे.

Political News : 'विरोधी गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील'

Rajasthan Political News : काँग्रेस अध्यक्ष व राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसमध्ये पेच कायम आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या वतीनं अंबिका सोनी व आनंद शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांच्याशी चर्चा करीत आहेत. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचे समकक्ष असून, ते गेहलोत यांच्या पाठीशी उभे आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वतीनं मध्यस्थी करणारे अंबिका सोनी व आनंद शर्मा यांनी अशोक गेहलोत यांना स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही अटीवर चर्चा होऊ शकत नाही. गेहलोत यांनी आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्यानंतरच चर्चा होऊ शकेल, असं सोनिया गांधींचं मत आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये हे संकट संपवण्यासाठी काँग्रेस हायकमांड (Congress High Command) जितके प्रयत्न करत आहे, तितक्याच अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडं अशोक गेहलोत यांची सोनिया गांधींसोबत दिल्लीत बैठक सुरू आहे, तर जयपूरमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: PFI च्या ट्विटर अकाउंटवरही बंदी; सरकारच्या तक्रारीनंतर 'ट्विटर इंडिया'ची मोठी कारवाई

'इतर गटाच्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही'

अशोक गेहलोत गटाचे आमदार गोविंद राम मेघवाल (MLA Govind Ram Meghwal) यांनी थेट काँग्रेस हायकमांडलाच चॅलेंज केलं आहे. मेघवाल म्हणाले, इतर गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील, अशी धमकी वजा इशारा त्यांनी हायकमांडला दिला आहे. हे पहिल्यांदाच घडलंय, जेव्हा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीनं दुसऱ्या पक्षाच्या मदतीनं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं इतर गटाच्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला

परसादी मीणा यांचा पुन्हा सचिन पायलटांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री अशोक गेहलोत जनपथवर पोहोचले आहेत. इथं ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. केसी वेणुगोपालही 10 जनपथवर पोहोचले आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलटही (Sachin Pilot) आज सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं कळतंय. गेहलोत सरकारमधील मंत्री परसादी लाल मीणा यांनी पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, जो व्यक्ती भाजपच्या कार्यालयात जावून बसतो, त्या व्यक्तीला आम्ही मुख्यमंत्री म्हणून स्वीकारु शकत नाही. जनता आम्हाला सोडणार नाही आणि आम्ही पुढची निवडणूक जिंकू शकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.