Ichalkaranji Pollution : औद्योगिक प्रगतीच्या सावलीत इचलकरंजीचा श्वास कोंडतोय; वायू प्रदूषणाने आरोग्याचा गंभीर इशारा
Ichalkaranji Air Pollution Crisis : वस्त्रोद्योग व कारखान्यांमुळे आर्थिक प्रगती झाली असली तरी, त्याचबरोबर वायू प्रदूषणाने इचलकरंजीच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
इचलकरंजी : इचलकरंजी हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. वस्त्रोद्योग, सूतगिरण्या, यंत्रमाग, सायझिंग व प्रोसेस युनिटस्मुळे शहराची आर्थिक घडी भक्कम झाली आहे.