Chain Snatching Arrest : बीड जिल्ह्यात यापूर्वी ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. साडेतीन तोळे सोन्याच्या चेन चोरीप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
इचलकरंजी : शहरात एका कार्यक्रमाच्या गर्दीत चोरी करणाऱ्या बीड येथील चेन स्नॅचिंग टोळीतील अट्टल चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. दत्ता श्रीमंत जाधव (वय २९, रा. गांधीनगर, जि. बीड) असे त्याचे नाव आहे.