

Former deputy mayor case Ichalkaranji
esakal
Ichalkaranji Clash Latest News: (ऋषीकेश राऊत) महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तास आधी गांधी कॅम्प परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपच्या दोन गटांतील समर्थकांत तुफान राडा झाला. जोरदार वाद उफाळून येत शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. एकमेकांना जमिनीवर पाडून मारहाण, शर्ट फाडण्यापर्यंत प्रकार घडला. या घटनेनंतर दोन्ही गटांनी हातात तलवारी, लाकडी बॅट घेऊन रस्त्यावर उतरल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.