
पोलिसांचं काम आमदाराने केलं
esakal
ठळक मुद्दे (3 Highlight Summary Points)
इचलकरंजीतील कुडचे मळा परिसरातील अवैध दारू अड्ड्यावर आमदार राहुल आवाडेंनी स्वतः छापा टाकत अड्डा बंद केला.
महिलांच्या वारंवार तक्रारीनंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याने आमदारांनी पुढाकार घेत पोलिसांनाच धडा शिकवला.
घटनेनंतर पोलिसांनी साठा जप्त केला असून अड्डाचालक बापलेक फरार आहेत; चौकशी सुरू आहे.
Ichalkaranji Crime : इचलकरंजी येथील कुडचे मळा बाळनगर परिसरात सुरू असणाऱ्या अवैध दारू अड्ड्यावर अखेर आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः छापा टाकत तो अड्डा बंद पाडला. स्थानिक महिलांच्या वारंवार तक्रारींनंतरही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आमदार आवाडेंनी पुढाकार घेत ही कारवाई केली.