Ichalkaranji Development : वस्त्रनगरीची ओळख धूसर; राजकीय उदासीनतेत इचलकरंजीचा विकास भरकटला
Political Apathy Slows Ichalkaranji Development : सुळकूड पाणी योजनेच्या विलंबामुळे इचलकरंजीत आजही अनियमित आणि कमी दाबाचा पाणीपुरवठा नागरिकांना सहन करावा लागत आहे.
इचलकरंजी : वस्त्रनगरी ओळख असलेले इचलकरंजी शहर आज विकासाच्या वाटेवर भरकटलेले दिसत आहे. एकेकाळी वस्त्रोद्योगामुळे झळाळी मिळवलेले हे शहर सध्या राजकीय उदासीनता आणि रखडलेल्या प्रकल्पांत अडकले आहे.