
Mount Kilimanjaro Summit
esakal
Kilimanjaro Expedition : इचलकरंजी येथील सर्जन डॉक्टर महेश बनकर यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च पर्वत शिखर असलेले माऊंट किलिमांजारो सर करीत तिरंगा फडकाविला. याबद्दल टांझानिया सरकारने या यशस्वी चढाईबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव केला आहे. डॉक्टर बनकर यांनी आपल्या व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे. यापूर्वीही त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. माऊंट किलिमांजारो शिखर सर करणे हे अत्यंत आव्हानत्मक होते.