

Ichalkaranji Drinking Water Issue
esakal
CM Fadnavis Kolhapur Visit : इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आहे. तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. लोकवर्गणीतून इचलकरंजीत उभारण्यात आलेला त्यांचा पुतळा शासनाचा नसून जनतेचा आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
येथील मलाबादे चौकात साकारण्यात आलेल्या ‘शंभूतीर्थ’चा लोकार्पण सोहळा हजारो जनसागराच्या साक्षीने झाला. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.