Kolhapur News: निवडणुकीतील आश्वासने हवेतच; पाणीटंचाई, प्रदूषण आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत
Ichalkaranji Politics: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेली अनेक आश्वासने अद्याप अपूर्ण राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे; विकासकामे ठप्प, तर मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी जनतेला अजूनही संघर्ष करावा लागत आहे.
इचलकरंजी: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आठवणी ताज्या होत आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची चर्चा होत आहे.