

Broken Promises and Political Reality
sakal
इचलकरंजी : इचलकरंजीचे राजकारण निवडणुकांच्या रणधुमाळीने चांगलेच तापते. लोकप्रतिनिधी बदलतात सत्तांतर होते. मात्र, शहराच्या मूलभूत समस्यांचा गाभा अजूनही ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. लोकसभा, विधानसभा असो, वा आता होणाऱ्या महापालिकेची निवडणूक प्रत्येक उमेदवाराला याच जुन्या समस्यांच्या कुबड्या घेऊन मतदारांच्या दारात जावे लागत आहे.