esakal | उपचाराचा खर्च परवडेना; 5 वर्षांच्या मुलाला फेकलं नदीत I Crime
sakal

बोलून बातमी शोधा

boy drown

उपचाराचा खर्च परवडेना; 5 वर्षांच्या मुलाला फेकलं नदीत

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी - जन्मदात्या पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून बापाने मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला. बापाचे नाव सिकंदर हुसेन मुल्ला (रा.कबनुर ) असे समजते.याबाबतची नोंद गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. या पाच वर्षाच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहे. लहान मुलांना क्रूरपणे हत्या केल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना असून हातकणंगले तालुक्यातील तिसरी घटना असल्याने नागरिक हादरून गेले आहेत. मुलाचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. त्याचा शोध घेतला जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सिकंदर मुल्ला हे गेल्या काही वर्षापासून कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे लहानपणापासूनच त्याला आजाराने वेढल्याने मुल्ला कुटुंबीय सिकंदर हे सततच्या खर्चाने त्रस्त झाले होते.या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले. त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने त्यांचा शोध घेतला. त्या वेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम दिला. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्‍या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी गुरूवारी रात्री सायकलवरून पंचगंगा नदीत मोठ्या पुलावरून पाच वर्षाच्या मुलाला थेट फेकून दिले. त्यानंतर स्वतः घरी येऊन नातेवाईकांना मुलाला फेकून दिल्याची दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावर कोणाचा विश्वास बसला नाही.

हेही वाचा: हळदीत व्यापारी आक्रमक ; ग्रामसेवकांला कार्यालयातच केले बंदिस्त

मुलगा बेपत्ता असल्याने तो बेपत्ता असल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सिकंदर मुल्ला यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी पंचगंगा नदीत पाच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पाहणी केली. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अशा प्रकारची ही चौथी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

loading image
go to top