काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही इचलकरंजीतील कार्यक्रमात हाळवणकर यांच्या विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
इचलकरंजी : राज्यपाल नियुक्त १२ पैकी उर्वरित ५ आमदारांमध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांना लॉटरी लागणार काय, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी (Ichalkaranji Assembly Election) पक्षाच्या निर्णयानुसार हाळवणकर यांनी उमेदवारीचा त्याग केला होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत चर्चा झाली होती.