Ichalkaranji GST : जीएसटी परतावा, पाणी योजना, उद्योगांना चालना; इचलकरंजीसाठी मोठी घोषणा
CM Devendra Fadnavis Assures : राज्य शासनाने पुढील पाच वर्षांचा जीएसटी परतावा निश्चित केल्याने इचलकरंजीच्या विकासाला आर्थिक बळ मिळणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करत शहरासाठी मोठी विकासदृष्टी मांडण्यात आली.
इचलकरंजी : ‘राज्य शासनाने पुढील पाच वर्षांच्या जीएसटी परताव्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. लवकरच मनाप्रमाणे इचलकरंजीला जीएसटी परतावा मिळेल’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.