कोल्हापूर Breaking - इचलकरंजीत हनी ट्रॅपचा तिसरा बळी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 हनी ट्रॅप

तरुणाने आत्महत्या हनी ट्रॅपमुळे केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

कोल्हापूर Breaking - इचलकरंजीत हनी ट्रॅपचा तिसरा बळी?

इचलकरंजी : गेल्या महिन्यात एकापाठोपाठ हनी ट्रॅपला कंटाळून दोन जणांनी आत्महत्या केली. आता या हनी ट्रॅपने शहरात तिसरा बळी घेतला आहे. सुतार माळ्यातील 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सुसाईड नोटमध्ये त्याने मोबाईलचा पासवर्ड लिहल्याने हनी ट्रॅपचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुणाने आत्महत्या हनी ट्रॅपमुळे केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. अधिक तपास गावभाग पोलिस करत आहेत.

हेही वाचा: '1993 ला बाळासाहेबांमुळे हिंदू जिवंत, त्यांचे वारसदार मात्र भूमिकाहिन'

शहरात दिवसेंदिवस हनी ट्रॅपची गंभीरता अधिकच स्पष्ट होत आहे. गेल्या महिन्यात दोन जणांनी हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केली. तर शनिवारी रात्री सुतार यातील एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीत मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवल्याने हनी ट्रॅपची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी ही आत्महत्या हनी ट्रॅपमधून झाल्याची चर्चा सुरू होती. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर बदनामीच्या भीतीने त्याने आत्महत्या केली. हे सांगण्यासाठी आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला असावा, असा शक्यता वर्तवली जात आहे. हनी ट्रॅपच्या दाट संशयातून अधिक तपास गावभाग पोलिस करत आहेत.

हेही वाचा: जयंतरावांचा अश्‍वमेध पुन्हा एकदा रणांगणात

loading image
go to top