BJP–Shiv Sena (Shinde) : इचलकरंजी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याबाबत हालचाली वेग घेत असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात युतीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची भूमिका अद्याप अस्पष्ट.
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेसाठी महायुतीतील घटक पक्षांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय मागे पडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना (शिंदे) यांच्यात युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले.