Ichalkaranji Mayor Election : उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर; उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

first mayor of Ichalkaranji municipal corporation : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी भाजपकडून उदय धातुंडे, तर उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांची निवड करण्यात आली आहे.
BJP Mayor Candidate, Ichalkaranji Corporation Election

BJP Mayor Candidate, Ichalkaranji Corporation Election

esakal

Updated on

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या (Ichalkaranji Corporation Election) पहिल्या महापौरपदासाठी (Ichalkaranji First Mayor) भाजपकडून उदय धातुंडे यांचे, तर उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित झाले आहे. शुक्रवारी (ता. ६) याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे दाखल केला जाणार आहे. धातुंडे हे आमदार राहुल आवाडे यांचे कट्टर समर्थक आहेत, तर डाळ्या यांची माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे निकटवर्तीय अशी राजकीय क्षेत्रात ओळख आहे. दोघेही प्रथमच निवडून आले असून, भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला आहे. (first mayor of Ichalkaranji municipal corporation)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com