Ichalkaranji Elections : इचलकरंजीत भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ वेगात; विरोधी आघाडीस आणखी धक्का देण्याची तयारी
BJP Accelerates Political Moves : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात वेग, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे यांच्या भाजप प्रवेशामुळे विरोधी आघाडीला मोठा धक्का. जागावाटप रखडल्याने शिव-शाहू विकास आघाडीत अस्वस्थता, वेगळ्या भूमिकेची शक्यता
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे. पुढील दोन दिवसांत आणखी एका मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत.