Ichalkaranji Election : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा तिढा कायम; भाजप-महाविकास आघाडीत इच्छुकांची धावपळ आणि राजकीय अस्वस्थता वाढली
BJP–MVA Strategy : आचारसंहिता लागू होताच इचलकरंजीतील राजकीय हालचालींना वेग,भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त; बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी लांबणीवर. भाजपमधील नाराजीचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीची सावध प्रतीक्षा
इचलकरंजी : महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता लागू करताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्व राजकीय पक्षांची तयारी आता वेग घेऊ लागली आहे.