

Heavy Rush at Ward Committee Offices
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, मात्र चारही प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी दिवसभर मोठी वर्दळ वाढली होती. दिवसभरात एकूण १६२ उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली. सर्वाधिक अर्जांची प्रभाग समिती कार्यालय अ (जुनी पालिका) येथून विक्री झाली आहे.