Ichalkaranji Municipal Election
esakal
इचलकरंजी निवडणुकीत शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा देण्याची मागणी
महाविकास आघाडीकडे शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा इशारा
वैभव उगळे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन
इचलकरंजी : आगामी होऊ घातलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत (Ichalkaranji Municipal Election 2025) महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही, तर स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी आज झालेल्या शिवसेना इचलकरंजी शहर कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिला.