

Voters queue up at an Ichalkaranji polling station as turnout improves in the afternoon.
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असली तरी प्रारंभी मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सकाळपासूनच अनेक प्रभागांत मतदान केंद्रांवर शुकशुकाटाचे वातावरण होते. तर शहरातील बहुतांशी केंद्रात दुपारी १२ पर्यंत मतदानाची गती अत्यंत संथ राहिली.