

Ichalkaranji Politics
esakal
Ichalkaranji Political Latest News : इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.