Ichlkaranji Development : कधीकाळी शहराची शान असलेली उद्याने आज ओसाड; इचलकरंजीतील विरंगुळ्याची ठिकाणे शेवटच्या घटका मोजताहेत
Neglected Public Park : देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षिततेअभावी इचलकरंजीतील बहुतांश उद्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून विरंगुळ्याचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील उद्याने एकेकाळी केवळ शहरवासीयांसाठीच नव्हेत, तर परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठीही मनोरंजन, विरंगुळा आणि आनंदाची हक्काची ठिकाणे होती.