

Ichalkaranji Powerloom Protest rahul awade office
esakal marathi news
Ichalkaranji loom workers agitation : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी सुरू झालेल्या यंत्रमाग बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात हिंसक वळण लागले. तारदाळ, खोतवाडी, कोरोची, गणेशनगर परिसरातील सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यात राडा झाला. यामध्ये सात ते आठ कारखान्यातील सुताची बिमे आंदोलकांनी कापली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.