Ichalkaranji Revenue Department: महसूल खात्यातील लाचखोरीवर सातत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असली, तरी चौकशी आणि निलंबनाची प्रक्रिया महिनोनमहिने रेंगाळत असल्याने भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये निर्भयतेची भावना वाढली आहे
इचलकरंजी: इचलकरंजी शहरात महसूल खात्यातील लाचखोरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. काही वर्षांत महसूल विभागातील चार कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.