अपघाताचा राग मनात धरुन आगारात तोडफोड; इचलकरंजीतील प्रकार

अपघाताचा राग मनात धरुन आगारात तोडफोड; इचलकरंजीतील प्रकार
Summary

शहरात दहशत माजवण्याच्या या घटनेने नागरिक धास्तावले आहेत.

इचलकरंजी : तीन दिवसापूर्वी एसटी अपघातात झालेल्या मृताच्या आणि जखमीच्या सर्व मित्रमंडळींनी एसटी आगारात तोडफोड केली. अपघाताचा राग मनात राग नऊ एसटी व पाच दुचाकी फोडल्या. या घटनेत चार एसटी कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. शहरात दहशत माजवण्याच्या या घटनेने नागरिक धास्तावले आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. शहापूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

अपघाताचा राग मनात धरुन आगारात तोडफोड; इचलकरंजीतील प्रकार
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

शहरामध्ये अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बेशिस्त वाहन चालवणे यासारखे प्रकार वाढू लागले आहेत. शहरामध्ये दोन दिवसापूर्वी वर्धमान चौकात एसटी व दुचाकीची धडक होऊन तीनजण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये एका तरुणाचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला, याचा मनात राग धरून काल मित्रमंडळी व नातेवाईक यांनी शहरातील शहापूर आगारात रात्री साडेबाराला एसटीवर दगडफेक केली. 9 एसटीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दुचाकींचीही तोडफोड केली.

अपघाताचा राग मनात धरुन आगारात तोडफोड; इचलकरंजीतील प्रकार
कोण आहे केपी गोसावी? आर्यनसोबता सेल्फी झाला होता व्हायरल

या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये वाचमन पांडुरंग आनंदा चोपडे (बुद्रुक, पाडळी) तालुका हातकणंगले नवनाथ सीताराम हिप्परकर (शीबोळे ता. जत) कृष्णा सदाशिव चोपडे (सुळकुड, ता. कागल) सुरेश शिवाजी केसरकर (गणेश नगर, इचलकरंजी) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनास्थळी दोन आरोपींना एसटी कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरांमध्ये दहशत पसरली आहे. यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सध्या या दोन दहशत माजवणाऱ्या आरोपींकडून इतर आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. काही नातेवाईकांनी घरामध्ये जाऊन कर्मचार्‍यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी पोलिसांनी वातावरण शांत केले आहे. पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com