Ichalkaranji City : अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली इचलकरंजी; रस्ते गुदमरले, वाहतूक ठप्प, नागरिक हैराण
Street Encroachment Crisis : अतिक्रमण आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात इचलकरंजीचे मुख्य रस्ते, वाहतुकीचा श्वास कोंडला, राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई कुचकामी; नो-हॉकर्स झोन केवळ कागदावर. नव्या महापालिका सभागृहाकडून अतिक्रमणमुक्त शहरासाठी ठोस धोरणाची अपेक्षा
इचलकरंजी : इचलकरंजीतील बहुतांश रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. विशेषतः मुख्य मार्ग फेरीवाल्यांच्या मालकीचाच झाला आहे. त्यातून वाहनचालकांना मार्ग शोधताना तारेवरची कसरत करावी लागते.