Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Crime News Ichalkaranji : इचलकरंजीच्या तारदाळ येथील दर्गा चौकात राजकीय वादातून भीषण प्रकार घडला. वाद चिघळल्याने एका व्यक्तीवर चाकूने छाती व पोटावर वार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली.
Ichalkaranji knife attack latest news

Ichalkaranji knife attack latest news

esakal

Updated on

Ichalkaranji Political Dispute Stabbing : तारदाळ येथील दर्गा चौकात जुन्या राजकीय वादातून आज सायंकाळी दोन तरुणांनी एकमेकांवर चाकूने वार केले. त्यात चाकूचे सपासप वार झाल्याने जावीद रशीद मुजावर (वय १९, रा. जावईवाडी, आंबेडकर चौकाजवळ, तारदाळ) याचा जागीच मृत्यू झाला तर यश तानाजी गायकवाड (२१, रा. दत्त डेअरीजवळ, तारदाळ) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शहापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला आयजीएममध्ये दाखल केले आहे. वर्दळीच्या मुख्य चौकात भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे तारदाळ चौक व परिसरात मोठी खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com