
Vastranagari Drug Crisis : ऋषिकेश राऊत : गांजा-चरसच्या धुरात आधीच लपेटलेले शहर आता प्रतिबंधित इंजेक्शन आणि मेफेड्रॉनसारख्या (एमडी) जीवघेण्या ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. हे केवळ काही गुन्हेगारांचे कारनामे राहिलेले नसून, ग्रामपंचायत सदस्य, जिम प्रशिक्षक, मेडिकल चालक, तर दिल्लीहून आलेला तरुण इंजिनिअर यांचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ही एक नशेची अंडरवर्ल्ड साखळी असून, ती शहरातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत विस्तारली आहे. आता इचलकरंजीला पोखरणाऱ्या नशेच्या महासंकटाची घंटा वाजली आहे.