

Voter Help Centers Begin
sakal
इचलकरंजी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात चार विभागीय कार्यालयांमध्ये मतदार सहाय्यता केंद्रे सुरू केली आहेत. मतदार यादीतील विविध तक्रारी, नाव शोधणे, दुरुस्ती, नाव वगळणे किंवा नव्याने समाविष्ट करणे, या सर्व बाबींवर तत्काळ मार्गदर्शन करण्यासाठी ही केंद्रे काम करणार आहेत.