
Panchganga River : कापड प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी प्रकल्पांचे आता आधुनिकीकरण होणार आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झेडएलडी (झीरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी ६०९ कोटी ५८ लाख रुपये इतक्या प्रस्तावित खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित मक्तेदार कंपनीस कार्यादेश दिला जाणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी आज येथे दिली.