
Crime News Ichalkaranji : वजीर गँगने गावभागातील जगताप तालीम मंडळ चौकात वाढदिवस साजरा करत धारधार हत्यारांसह राडा घातला. एका हातात हत्यारे आणि दुसऱ्या हातात फटाके धरून दहशत करणाऱ्या टोळक्याला मज्जाव करताच त्यांनी नागरिकांवर हल्ला चढविला. यात टोळक्याने ब्युटी पार्लरवर आणि बाजूच्या घराच्या दरवाजांवर दगडफेक करत हत्याराने तोडफोड केली. लोखंडी एडक्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करत तिलाही जखमी केले.