

कोल्हापूर : जगभरात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, कोकण परिसरातील पाच वैद्यांनी मिळून उपचार व प्रतिबंधात्मक उपाय अशा दोन्ही पातळीवर आयुर्वेदीय दृष्टिकोनातून एक शोधनिबंध भारत सरकारला पाठवला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्यासह सर्व प्रमुख आस्थापना आणि वैद्यकीय संघटनांनाही तो ई-मेलच्या माध्यमातून पाठवला असून, त्यातून सुचवलेल्या आयडियल प्रोटोकॉलची अंमलबजावणी झाली तर जगभरातील कोरोनाचे संकट दूर होण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
आयुर्वेद हे प्राचीन वैद्यकशास्त्र असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शास्त्राचा फारसा वापर करून घेतला गेला नाही. या पार्श्वभूमीवर या पाच वैद्यांनी आयुर्वेदातील विविध प्राचीन दाखले देत हा शोधनिबंध तयार केला आहे. डॉ. नीलेश कोदे (कणकवली), डॉ. श्रीराम खाडिलकर (मालवण), डॉ. माधव पटाडे (कुडाळ), डॉ. ऋषीकेश जाधव (कोल्हापूर) व डॉ. समीर जमादार (कोडोली) यांचा या टीममध्ये समावेश आहे.
असे आहेत प्रोटोकॉल...
- संक्रमित रुग्ण ज्या लक्षणांनी रुग्णालयात भरती होतात, त्या लक्षणांचा संच करून त्या दृष्टिकोनातून
मुख्य व्याधी म्हणून पाचप्रकारे वर्गीकरण व त्यासाठी संयुक्तिक आयुर्वेद औषधी प्रोटोकॉल.
- ज्यांच्यामध्ये डायबेटीस, हृदयविकार, श्वसनविकार व इम्युनो कॉम्प्रोमाईज विकार यांसारखे
आजार असताना कोरोनाची लागण होते, अशा रुग्णांमध्ये मृत्यूदर जास्त दिसून येत असल्याने या रुग्णांसाठी चार वेगळे प्रोटोकॉल.
- निरोगी लोकांमध्ये कोरोना संसर्गापासून बचावासाठीचा प्रोटोकॉल, तसेच हाय रिस्क कॉन्टॅक्ट,
लो रिस्क कॉन्टॅक्ट, विविध हेल्थ वर्कर्स, नर्सेस, डॉक्टर्स यांच्यासाठीचे आरोग्यरक्षणार्थ प्रोटोकॉल.
- कोरोना संक्रमानातून बरे झालेल्या रुग्णांसाठी पाहिले 14 दिवस व नंतरचे 14 दिवस
असा एकूण 28 दिवसांचा पुनः प्रादुर्भाव टाळण्यासाठीचा प्रोटोकॉल.
स्थान परित्याग अन् आयुर्वेद
आयुर्वेदात "स्थान परित्याग' ही संकल्पना आहे, जी सध्या "सोशल डिस्टन्सिंग' म्हणून प्रचलित झाली आहे. त्याशिवाय नस्य चिकित्सा (नाकामध्ये औषधी तेल), पंचवल्कल क्वाथ, हरिद्रा जल, इरिमेदादी तैल यांचा वापर करून तोंडामध्ये औषधी काढा किंवा तेल भरून थोड्या वेळाने चूळ भरणे, अशा उपायांसह हलका आहार, प्राणायाम- अनुलोम विलोम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपायांबाबतही विस्तृत मार्गदर्शन आहे.
उपलब्ध चिकित्सा सिद्धांतांचा विचार करून आजच्या या जागतिक महामारीमध्ये सहजरीत्या चिकित्सा करता यावी, यासाठी प्रमुख नऊ प्रकारे रुग्णांचे वर्गीकरण करून त्या प्रत्येक प्रकारासाठी आयुर्वेद औषधी चिकित्सा वर्णन केली आहे. ऍलोपॅथी उपचारांसोबत हा प्रोटोकॉल वापरल्यास मृत्यूदर कमी होऊन रुग्ण लवकर बरे होण्यास व रोगाचा पुनः प्रादुर्भाव टाळण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ. ऋषीकेश जाधव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.