esakal | Video - तुम्ही घेतलेला आंबा देवगड हापूसच आहे ना? फसवणुकीपासून सावधान

बोलून बातमी शोधा

null
Video - तुम्ही घेतलेला आंबा देवगड हापूसच आहे ना? फसवणुकीपासून सावधान
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : विविध जातींचे आंबे बाजारपेठेत आले आहेत. ग्राहकांची मागणीही चांगली आहे; मात्र चांगल्या दर्जाचा आंबा किफायतशीर भावात सुयोग्य आवरणात देणारे विक्रेते आहेत. काही विक्रेते देवगड हापूसच्या बॉक्‍समध्ये दक्षिणेतील आंबा घालून चढ्या भावात विक्री करत असल्याचे चित्र आहे. यात ग्राहकांची फसवणूक होत असून, प्रामाणिक विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. त्याची झलक शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेपासून किरकोळ बाजारातही दिसते.

संचारबंदीमुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने मुले घरी आहेत. त्यांना घरबसल्या आंबे खाण्याचा मोह वाढत आहे. यात आंबा हंगाम तेजीत आहे. दिवसभरात शेकडो पेट्या, हजारो बॉक्‍सची विक्री होत आहे. ग्राहक मिळविण्यासाठी शाहू मार्केट यार्डातील बहुतांशी विक्रेते चांगल्या दर्जाच्या आंब्याची विक्री करतात. त्याचे भावही नियमित आहेत. काही मोजक्‍या किरकोळ विक्रेत्यांकडून सौद्यात कमी भावातील मद्रास हापूस, कर्नाटकचा लालबाग हापूस आंबा खरेदी केला जातो. त्याचा भाव १५० रुपयांच्या आसपास असतो. तोच कमी किमतीतील आंबा देवगड हापूस, रत्नागिरी हापूस अशी अक्षरे लिहिलेल्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून विकला जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: लस घ्यायची आहे! पाहिला डोस, दुसरा डोस घेताना ही घ्या दक्षता

देवगड हापूस सरासरी ३०० रुपये डझन आहे, तरी कमी दर्जाचा आंबा चांगल्या भावात विकला जातो. याचा फटका देवगड हापूसच्या बॉक्‍समध्ये देवगड हापूसच विकतात अशा प्रामाणिक विक्रेत्यांना बसतो. शिवाय ग्राहकांची फसवणूकही होते, असे बोगस विक्री करणारे विक्रेते मार्केट यार्डापासून किरकोळ बाजारपेठेत मोजक्‍या संख्येने आहेत. फसवणुकीची तक्रार कोणी करीत नाही. परिणामी कारवाई होत नाही.

एका बॉक्‍सचे भाव

  • लालबाग आंबा ६० ते १०० रुपये

  • देवगड हापूस २०० ते ७०० रुपये

  • पायरी आंबा १२० ते ४५० रुपये

  • देवगड हापूस पेटी १००० ते ३२०० रुपये

हेही वाचा: कोरोनाकाळात सोप्या व्यायामाने रहा स्वस्थ; हृदय आणि फुफ्फुस ठेवा तंदुरुस्त

"दक्षिणेकडील आंबा कोकणी हापूस सारखाच आहे. त्याचे भाव कोकणी हापूसपेक्षा कमी आहेत. कमी पैशात आंबा खरेदी करायचा आहे, त्यांना दक्षिणेचा हापूस परवडतो; मात्र हा आंबा कोकणी हापूसपेक्षा कमी भावातच विकला जातो. खराब होऊ नयेत म्हणून पॅकिंग केले जाते."

- अन्वय बागवान, फळ विक्रेते