IGM Hospital Quarters:
sakal
कोल्हापूर
Ichakaranji News: आयजीएमच्या सदनिकांना चोरीचं ग्रहण! प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नशेखोरांचे अड्डे आणि असुरक्षिततेचं सावट
IGM Hospital Quarters: आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या निवासी सदनिकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या जागा गुन्हेगारी व अनैतिक कृत्यांचे केंद्र बनल्या आहेत.
इचलकरंजी: एकेकाळी आयजीएम रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या निवासी सदनिका तांत्रिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई आणि निर्णयक्षमतेचा अभावामुळे दुरवस्थेत आहेत. या इमारतींतील लोखंडी खिडक्या, दरवाजे, गेट खुलेआम चोरीस जात आहेत.

